कोचिंग सेंटर्सच्या ( Coaching Centres) दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) कारवाईचा बडगा उचलला आहे. “कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रतिबंध 2024” अंतर्गत २४ कोचिंग सेंटर्सवर ७७.६० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
सीसीपीएने आतापर्यंत ४९ नोटिसा बजावल्या असून, जाहिरातीत हमखास यशाची हमी देणे, रँक मिळवण्याची खात्री देणे, सेवा न देता शुल्क परत न करणे यासारख्या कारणांवरून ही कारवाई ( Coaching Centres) केली आहे.
ग्राहक संरक्षण कायदा, 2019 आणि नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आदेश सर्व कोचिंग सेंटर्सना देण्यात आले आहेत. सीसीपीएने स्पष्ट केलं आहे की, कोणतीही जाहिरात भ्रामक, फसवणूक करणारी किंवा चुकीची माहिती देणारी असल्यास ती गुन्हेगारी स्वरूपाची मानली जाईल आणि त्यावर कठोर कारवाई केली जाईल.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
वयाच्या ६०व्या वर्षी पहिल्यांदाच लग्न करतोय ‘हा’ भाजप नेता, जाणून घ्या कोण त्यांची होणारी वधू
ईडी, सीबीआयच्या कारवायांनी मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही: रमेश चेन्नीथला
वक्फ दुरुस्ती कायद्याला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या तात्पुरत्या स्थगितीचे स्वागत, नवीन कायदा रद्द करा