मुंबई –अकोला-वाशिम-बुलढाणा मतदारसंघातून विधान परिषदेसाठी महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना विजयी करण्यासाठी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी झोकून देऊन काम करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
यासंदर्भात नाना पटोले म्हणाले की, विधान परिषदेसाठी अकोला वाशिम बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांचा विजय निश्चित आहे. आघाडीचा घटक नात्याने काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
नागपूर विधान परिषद निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या उमेदवाराने ५५ वर्षांचा भाजपाचा बालेकिल्ला नेस्तनाबूत करून दणदणीत विजय मिळवला होता. अकोला वाशिम बुलढाणामधूनही बाजोरियांच्या विजयासाठी महाविकास आघाडी कार्यरत असून नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता गोपीकिशन बाजोरिया यांच्या विजयासाठी काम करावे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.