लठ्ठपणावर शस्त्रक्रिया केल्यानंतर अभिनेत्रीचा रुग्णालयात मृत्यू

बंगळुरू – वजन कमी करण्याच्या प्रयत्नात कन्नड मालिका अभिनेत्रीला प्राण गमवावे लागले आहेत. अभिनेत्री चेतना राज (21) असे या अभिनेत्रीचे ( Kannada Serial actress Chethana Raj ) नाव आहे.  सोमवारी म्हणजे 16 मे रोजी तिचं ऑपरेशन झालं. त्यानंतर तिच्या फुप्फुसात पाणी भरल्यामुळे  तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार चेतनावर सोमवारी लिपोसक्शनचं ऑपरेशन झालं होतं.

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा चेतनाचे वडील गोविंद राज ( Chethanas father Govind Raj ) यांनी दावा केला आहे. रुग्णालयात योग्य आयसीयू आणि इतर यंत्रणा नाहीत. तिने कधीही शस्त्रक्रियेची ( Fat surgery on Chethana Raj ) माहिती दिली नाही. डॉक्टरांनीदेखील आम्हाला शस्त्रक्रियेपूर्वी माहिती दिली नसल्याचे गोविंद राज यांनी ( doctors negligence in fat loss surgery ) सांगितले. चेथनाने गीता आणि दोरेसानी ( Geetha and Doresani ) , ओलाविन निलदान ( serial ) या कन्नड मालिकांमध्ये काम केले होते. आणि तिने हवयमी ( havayamii film ) चित्रपटात काम केले. हा सिनेमा अद्याप प्रदर्शित झालेला नाही. अजून रिलीज व्हायचे आहे.

लिपोसक्शन म्हणजे काय? लिपोसक्शन म्हणजे जाडी कमी करण्याचं किंवा चरबी कमी करण्याचं ऑपरेशन. डॉक्टरांनी या ऑपरेशनवर गंभीर चिंता व्यक्त केलेली आहे.लिपोसक्शनमुळे मेदाचे ग्लोब्युल्स फुप्फुसात जाऊ शकतात, असं डॉक्टर सांगतात. या ऑपरेशनचा परिणाम दीर्घकाळ राहातो पण त्याचे अनेकदा वाईट परिणामही होतात.