संस्कार असावे तर असे! रश्मिका मंधाना तिच्या मोलकरणीच्याही पडते पाया, कारण हृदयाला भिडणारं

‘नॅशनल क्रश’ म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandhana) अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. पुन्हा एकदा अभिनेत्री तिच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. वास्तविक, या मुलाखतीत रश्मिकाने सांगितले आहे की, ती दररोज तिच्या घरातील नोकरदारीणच्या पाया पडते. यामागचे कारणही अभिनेत्रीने स्पष्ट केले असून हे कारण कोणाच्याही हृदयाला भिडणारं आहे. (Rashmika Mandhana Touches House Help Feet)

एका मीडिया संस्थेशी संवाद साधताना रश्मिकाने सांगितले की, ‘माझ्यासाठी छोट्या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. मी सकाळी उठते आणि माझ्या पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवते. मी माझ्या मित्रांना भेटते, यामुळे मला आनंद होतो. शब्द खरोखर शक्तिशाली असतात आणि ते एखाद्या व्यक्तीला जोडू किंवा तोडू शकतात, म्हणूनच जेव्हा कोणी काही बोलतो तेव्हा ते माझ्यासाठी महत्त्वाचे असते. मी माझ्या डायरीत छोट्यातल्या छोट्या गोष्टी लिहून ठेवते.’

रश्मिका पुढे म्हणाली, ‘मला घरी गेल्यावर आदराने सर्वांच्या पाया पडण्याची सवय आहे. अगदी मी माझ्या घरच्या मोलकरणीच्याही पाया पडते, कारण मला घरातील इतर व्यक्ती आणि तिच्यात फरक करायला आवडत नाही. मी सर्वांचा आदर करते. एक व्यक्ती म्हणून मी अशीच आहे.”