ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाल्याचे समजताच अभिनेत्री उर्वशी रौतेलाने केले असे काही

Rishabh Pant Accident: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्या कारचा शुक्रवारी सकाळी अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की दुभाजकाला धडकल्याने क्रिकेटपटूची मर्सिडीज कार पूर्णपणे जळून खाक झाली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पंतच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. (Know how exactly Rishabh Pant’s accident happened? The Mercedes burned to ashes)

मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीहून उत्तराखंडमधील रुरकीला जाणारी ऋषभ पंतची मर्सिडीज कार आज पहाटे 5.15 वाजता नरसन सीमेवर रेलिंगला धडकली. अपघातानंतर कारने पेट घेतला. सुदैवाने वाटसरूंनी विंडो स्क्रीन तोडून पंतला गाडीतून बाहेर काढले. त्यावेळी तो कारमध्ये एकटाच होता. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे कार चालवत असताना त्याला झोप लागली आणि काही सेकंदातच कार अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळली आणि अपघात झाला. पंतवर डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पंतच्या अपघाताची बातमी पुढे आल्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिची काय प्रतिक्रिया पुढे येते? याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते. उर्वशीनेही नुकतीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे तिने अप्रत्यक्षपणे पंत लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केल्या असल्याचे दिसत आहे.

उर्वशीने तिच्या पोस्टमध्ये तिचा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती राजकुमारीसारखी सजली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने, ‘Praying अर्थातच प्रार्थना करत आहे’, असे लिहिले आहे. त्याच्यापुढे तिने पांढऱ्या हृदयाचा आणि कबूतराचा इमोजी जोडला आहे.

यावरून उर्वशी पंतसाठी देवाकडे प्रार्थना करत आहे, असे अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे. उर्वशीच्या या पोस्टवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, ‘भाभी जी ऋषभ भैया का ऍक्सीडेंट हो गया.’ यावर प्रतिक्रिया देताना काही चाहत्यांनी लिहिले आहे की, ‘इसीलिए वो दुवा मांग रही है.’ दुसऱ्या चाहत्याने लिहिले आहे की, ‘तभी तो वो प्रेयिंग कर रही है.’ याशिवाय काहींनी उर्वशीला ट्रोलही केले आहे.