आदित्य ठाकरेंनी पावसात भिजण्याची शरद पवारांची स्टाईल केली कॉपी; बंडखोरांवर केले शरसंधान

Mumbai  : शिवसेनेत (Shivsena) सध्या उभी फुट पडल्याने पक्ष वाचवण्यासाठी सध्या ठाकरे (Thackeray Father-Son)पितापुत्र प्रयत्न करत आहेत. माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे विविध ठिकाणी जाऊन शिवसैनिकांच्या सोबत संवाद साधत आहेत. मात्र आता आदित्य ठाकरे जरा वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहेत.

वडाळ्यात ‘निष्ठा यात्रे’वेळी आदित्य ठाकरेंनी भाषण  केलं. भाषण सुरू असतानाच जोरदार पावसाला सुरुवात झाली. मात्र, आदित्य ठाकरे यांनी आपलं भाषण सुरुच ठेवलं.या पावसातील सभेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत असून चर्चेचा विषय ठरत आहेत. यावेळी भर पावसात शिवसैनिकांचाही मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला.

कोसळणाऱ्या पावसाला साक्ष ठेवत, हे नाटकी सरकारही कोसळणार, असा विश्वास आदित्य यांनी शिवसैनिकांना दिला. दरम्यान, भरपावसात आदित्य ठाकरे यांनी केलेल्या या भाषणामुळे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar)यांच्या साताऱ्यातील सभेची अनेकांना आठवण झाली. अनेकांनी आदित्य यांचे कौतुक केले आहे तर काहींनी आदित्य यांना ट्रोल देखील केले आहे.