जिल्हा परिषद शाळांचा वीज पुरवठा खंडित होण्यास प्रशासन जबाबदार – युवासेना

पुणे – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या शाळा आता कुठे सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील ज्ञार्जनाच्या नात्याचे बंध अधिक घट होतांना दिसत आहेत. शालेय शिक्षण देशाच्या प्रगतीचा मुख्य स्रोत असतो. त्यामुळे येथील गैरसोय ही थेट देशाच्या भविष्यावर परिणाम करते. पुणे जिल्ह्यातील तब्बल 800 शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजबिल न भरल्यामुळे शाळांचा हा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व शाळा जिल्हा परिषद प्रशासनाच्या आहेत. सरकारी शाळांच्या गैरसोयीमुळेच पालक कर्ज काढून मुलांना खाजगी शाळेत शिक्षवतात याला जबाबदार प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे यात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली आहे.

यादव म्हणाले, वीज बिल न भरल्यामुळे पुणे जिल्ह्यातील 792 शाळांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. या सर्वच्या सर्व शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 3 हजार 639 जिल्हा परिषद शाळा आहेत. त्यापैकी 2847 शाळांमध्ये वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे. तर इतर शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यातील 128 शाळांचे मीटरचं वीज वितरणने काढून टाकले आहेत. या घटनेमुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक वर्गाला मनस्ताप सहन करावा लागतो आहे. या आशा गैरसोयीमुळेच राज्यातील पालक खाजगी शाळांची वाट निवडतात. प्रशासनाच्या चुकांमुळे पटसंख्या कमी असणाऱ्या शाळा बंद झाल्या पण या पटसंख्या कमी होण्याचे मूळ कारण या गैरसोयी आहेत याची जाणीव कधी होणार ? आदर्श शाळा म्हणून ज्या शाळांची मूर्तिमंत उदाहरण दिली गेली पाहिजेत त्याच शाळा अंधारात असतील तर शिक्षणाचा प्रकाश कधी आणि कसा पडणार ? याचा विचार एक सनामनिय अधिकारी म्हणून आयुष प्रसाद तसेच त्यांच्या सहकऱ्यांनी करायला हवा.

संबंधित घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी तसेच सर्व शाळांचा वीज पुरवठा पुन्हा सुरू होण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. प्रशासकीय यंत्रणेतील मुख्य अधिकारी म्हणून आयुष प्रसाद यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही करावी अशी विनंती युवसेनेकडून निवेदना द्वारे करण्यात आली आहे.