कौतुकास्पद : राज ठाकरे यांनी अंध विद्यार्थ्यांना थेट स्टेजवर दिले स्थान

पुणे – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत भूमिका घेतल्यापासून ते कायम चर्चेत राहिले आहेत. या वादग्रस्त मुद्द्यावरून त्यांनी आक्रमक होत आधी पाडवा मेळावा, नंतर ठाण्यात उत्तर सभा आणि नंतर पुन्हा मुंबईत झालेल्या सभांमधून तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यातच राज ठाकरेंचा अयोध्या दौरा (Ayodhya), त्याला भाजपा खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) यांनी केलेला विरोध आणि त्यानंतर राज ठाकरेंनी स्थगित केलेला दौरा या सगळ्याच मुद्द्यांवरून वातावरण तापलेलं असताना राज ठाकरे यांची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली.

यावेळी केलेल्या भाषणातून महाविकास आघाडीची(MVA)  अक्षरशः पिसं काढली. आपल्या भाषणात त्यांनी पाणी प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या,औरंगजेबाची कबर. महाविकास आघाडीची धोरणं यावर कडाडून हल्ला चढवला.  तत्पूर्वी आपल्या भाषणाच्या आधी कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी काही अंध विद्यार्थ्यांना मंचावर बोलावून त्यांना तिथं बसण्याची व्यवस्था केली. या त्यांच्या कृतीचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.