Ujjwal Nikam | ‘समाजातील गैरकृत्य रोखण्यासाठी ऍड. उज्ज्वल निकम यांना विक्रमी मतांनी विजयी करून लोकसभेत पाठवा’

मुंबई  | उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ऍड. उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले. या  जाहीर सभेला शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी संबोधित करताना सांगितले की, आजवर उज्ज्वल निकम यांनी वकिलीच्या माध्यमातून अनेक समाजकंटकांना फाशीच्या शिक्षा घडविल्या आहेत, येणाऱ्या काळात देखील खासदार बनून समाजाला न्याय देण्याचे कार्य करून समाजातील गैरकृत्य रोखण्यासाठी निश्चितपणे ते कार्य करतील तसेच केंद्रात मोदीजींचे हात बळकट होण्यासाठी आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार पुन्हा येण्यासाठी उज्ज्वल निकम यांना मतदान करून भरघोस मतांनी त्यांना निवडून आणावे असे आवाहन शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. यावेळी ऍड उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी डॉ. गोऱ्हे यांची भेट घेतली असता त्यांनी ऍड. निकम यांना विजयासाठी  शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी, ऍड. उज्वल निकम उमेदवार,  कला ताई शिंदे, कुणाल जी सरमळकर विभाग प्रमुख शिवसेना , संजय कुलकर्णी , शितल म्हात्रे विभाग प्रमुख महिला शिवसेना , रुबीना शेख , आतिष शिंदे वॉर्ड अध्यक्ष भा.ज.पा., शितल मंदावाना महामंत्री विधानसभा भाजपा,  राजू नैठा विधानसभा अध्यक्ष भाजपा,  राजू दाभोळकर जिल्हा उपाध्यक्षभाजपा,  शिवानीताई दानी वखरे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री,  विवेक पवार आर पी आय मुंबई महासचिव यांसह महायुतीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून अनेक लोकांना कोट्यावधींची मदत करण्यात आलेली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राबविलेल्या आहेत. महिला धोरणातून महिलांना प्रशासकीय व अर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महिलांना ५० टक्के बसमधे सवलत, आनंदाचा शिधा, लेक लाडकी योजना, येत असलेली मोफत शिक्षणाची योजना यातून शासन महिलांसाठी चांगले कार्य करीत आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनातून महिलांना सक्षम केले जात आहे. महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारमुळे  महिला सुरक्षित आहेत. तसेच स्त्रियांना राजकारणात सहभागी होता यावे याकरिता त्यांच्यासाठी लोकसभा, विधानसभेत आरक्षण देणार विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत मंजूर केले असल्याचे शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप