Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या ‘खुदा गवाह’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी अफगाणिस्तानात युद्ध थांबवण्यात आलं होतं, हे ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल! 1992 साली या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी खुद्द अफगाण राष्ट्रपतींची मुलगी पुढे सरसावली होती. ती बच्चन यांची इतकी मोठी चाहती होती की, त्यांना सुरक्षित शूटिंगसाठी पूर्ण मदत करावी, असा आग्रहच तिने वडिलांकडे धरला.
या चित्रपटाच्या काही भागांचे शूटिंग अफगाणिस्तानात व्हायचे होते. मात्र त्यावेळी देशात यादवी सुरू होती. यामुळे चित्रपटाचं शूटिंग धोकादायक होतं. पण राष्ट्रपतींच्या मुलीनं स्वतः पुढाकार घेतला आणि तिच्या वडिलांना विनंती केली की, अमिताभ बच्चन अफगाणिस्तानात येणार आहेत, त्यामुळे काही काळापुरतं युद्ध थांबवण्यात यावं. तिच्या हट्टामुळे राष्ट्रपतींनी काही भागांमध्ये युद्धविराम जाहीर केला आणि विशेष सुरक्षा दिली गेली.
‘खुदा गवाह’साठी एवढं प्रेम, समर्पण आणि व्यवस्था केवळ अमिताभ बच्चन यांच्यामुळेच झाली होती. त्यावेळी हा एक ऐतिहासिक प्रसंग ठरला. एक अभिनेता आणि त्याच्या चाहत्यांच्या प्रेमामुळे युद्ध थांबण्याचा प्रसंग, ही बॉलिवूड इतिहासातील एक अविस्मरणीय आठवण ठरली आहे.