फास्ट टॅग अनिवार्य केल्यानंतर महाराष्ट्र ठरलं सर्वाधिक पथकर वसुली करणारं राज्य

मुंबई – राष्ट्रीय महामार्गावरील पथकर वसुलीसाठी फास्ट टॅग अनिवार्य केल्यानंतरच्या गेल्या वर्षभराच्या कालावधीत महाराष्ट्र हे देशातलं सर्वाधिक पथकर वसुली करणारं राज्य ठरलं आहे. गेल्या 15 फेब्रुवारीला पथकर वसुलीसाठी फास्ट टॅग अनिवार्य केला गेला होता.

राज्यात फास्ट टॅग यंत्रणा अतिशय उत्तम पद्धतीनं काम करत असून 58 पथकर नाक्यांवर फास्ट टॅग यंत्रणेद्वारे पथकर वसुली केली जात असल्याचं राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणानं म्हटलं आहे.

पुणे मुंबई जुन्या महामार्गाबरोबरच पुणे सातारा महामार्गावरही अनेक वाहनचालक रोखीने पथकर भरत असल्याचं चित्र आजही दिसत आहे. त्याबद्दल काहीही बोलण्यास मात्र प्राधिकरणाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी नकार दिला.