मुंबई : बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ प्रीती झिंटा नुकतीच आई झाली आहे. इंस्टाग्रामवर, तिने आपल्या जुळ्या मुलांच्या आनंदाची बातमी शेअर केली. सरोगसीच्या माध्यमातून प्रीती आई झाली.तिने मुलांची नावं जय आणि जिया ठेवली आहेत. प्रीतीच्या घरचे, इंडस्ट्रीतील लोकं आणि तिचे चाहते ही न्यूज ऐकल्यानंतर खूप खूश आहेत.
त्याचबरोबर आता पुढचा नंबर कोणत्या सेलिब्रिटीचा आहे, असा अंदाजही सोशल मीडियावर लावला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सरोगसीद्वारे पालक बनण्याचा ट्रेंड वाढला आहे. अभिनेत्यांची लाईफस्टाईल, वय आणि वैद्यकीय शरीरयष्टी पाहून काही वेळा डॉक्टरही त्यांना तसा सल्ला देतात. अशाप्रकारे, पालक बनण्याच्या साखळीतील पुढचं नाव सलमान खानचं असण्याची शक्यता आहे. होय, या गोष्टीच नुसती चर्चाच नाही तर, खुद्द ‘दबंग खान’ने अनेकदा याकडे लक्ष वेधलं आहे.
बॉलिवूडमध्ये सरोगसीद्वारे पालक बनणाऱ्या सेलिब्रिटींची यादी मोठी आहे. शाहरुख खान-गौरी खान, आमिर खान-किरण राव, शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा, लिसा रे-जेसन या कपल्सने सरोगसीचा पर्याय निवडला, तर करण जोहर, एकता कपूर आणि तुषार कपूर यांसारख्या अविवाहित सेलिब्रिटींनीही सरोगसीचा पर्याय निवडला. मात्र सलमान खानने असं विधान केलं त्यावरून असं दिसतंय की तो लवकरच बाप होऊ शकतो.
निमित्त होतं ते म्हणजे ‘बिग बॉस 15’मधील वीकेंड का वॉर एपिसोडचं. सलमानची मैत्रिण आणि अभिनेत्री राणी मुखर्जी या शोवर पोहोचली होती. राणी ‘बंटी और बबली 2’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. यादरम्यान राणी सलमानला म्हणाली, ‘सलमान, मागच्या वेळी जेव्हा मी इथे आले होते तेव्हा तू मला म्हणाला होतास की, तुला मूल होणार आहे, ते मूल कुठे आहे?’ यावर सलमानने गंमतीने सांगितले की, ते मूल अजून प्रोसेसमध्ये आहे. मात्र यानंतर सलमान हातवारे आणि हावभावात काय म्हणाला, याकडे लक्ष द्यावं लागेल.
त्यानंतर राणी सलमान म्हणाली, ‘हे ऐकून मला वाईट वाटलं. पण ‘बंटी और बबली 3’ येईपर्यंत हे नियोजन व्हायला हवं होतं. यावर सलमान हातवारे करत म्हणाला, ‘तोपर्यंत एक नाही तर दोन होतील. तोपर्यंत बंटी आणि बबली दोघेही पूर्ण होतील. सलमान खानने वडील होण्याची इच्छा व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
https://youtu.be/3AmlxDP4tcU