रणबीर कपूरनंतर बॉलीवूडमध्ये संजय दत्तची भूमिका करणार नवनीत मलिक

‘लव्ह हॉस्टेल’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापासून ते ‘हिरोपंती 2’ मध्ये भूमिका करण्यापर्यंत, नवनीत मलिकने (Navneet Malik) काही उल्लेखनीय सिनेमात काम केले आहे. नवनीत आता आगामी चित्रपटात पुन्हा एकदा अष्टपैलू अभिनेता म्हणून आपली प्रतिभा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.

अभिनेता म्हणाला, माझ्यासारख्या नवोदित कलाकाराला प्रस्थापित कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणे खूप प्रेरणादायी आहे. अशा प्रोजेक्टवर काम करताना मला आनंद होत आहे आणि त्यासाठी खूप उत्सुक आहे. तो पुढे म्हणतो, “संजय दत्तची (Sanjay Dutt) भूमिका पडद्यावर साकारण्यासाठी मी खूप भाग्यवान समजतो. कारण प्रत्येकाला प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सचे जीवन चित्रित करण्याची संधी मिळत नाही. हा एक अप्रतिम शिकण्याचा अनुभव आहे.”

“संजय दत्तसारख्या दिग्गज स्टारची भूमिका साकारण्याची ही एक आव्हानात्मक संधी आहे. रणबीर कपूरने संजूमध्ये उत्तम काम केले आहे त्यामुळे मानके खूप उच्च आहेत आणि मी प्रेक्षकांच्या हृदयावर छाप सोडण्यासाठी खूप प्रयत्न करणार आहे.” असेही नवनीत म्हणाला आहे.

अभिनेत्याने या प्रकल्पाबद्दल जास्त खुलासा केला नाही, परंतु सूत्रांनी उघड केले की चित्रपटात नवनीत मलिक आणि मौनी रॉय यांच्यात प्रेमाचा त्रीकोन आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्याच्या भूतकाळातील भूमिकांनी खूप लक्ष वेधून घेतले आहे आणि त्याचे आधीपासूनच खूप चाहते आहेत.