संजय पांडे यांच्यानंतर आता संजय राऊत, अनिल परबही लवकरच तुरुंगात जातील; नवनीत राणांचे भाकीत

मुंबई – नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील (National Stock Exchange) एका गैरव्यवहार प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांना सक्तवसुली संचालनालयानं (ED) अटक केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याशी संबंधित एका फर्मने एनएसईच्या 91 पदाधिकाऱ्यांचे फोन टॅप केल्याचं यापूर्वी ईडीला आढळून आलं होतं.

संजय पांडे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी दिल्लीत अटक केल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत, शिवसेना नेते अनिल परबही (MP Sanjay Raut, Anil Parab) लवकरच तुरुंगात जातील असंही म्हटलंय.