संजय राऊत यांना जामीन मिळताच रोहित पवार यांच्याकडून वाघाचा व्हिडीओ ट्विट

मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी (Patra Chawl Land Scam) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut Bail) यांना अखेर 100 दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही राऊत यांना जामीन मिळाल्याचं स्वागत केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही एक व्हिडीओ ट्विट करून वाघ पिंजऱ्यातून सुटल्याचं म्हटलं आहे.रोहित पवार यांनी 12 सेकंदाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्या व्हिडिओत एका पिंजऱ्यातून एक वाघ मोठ्या रुबाबात झेप घेतो आणि चालू लागतो असं या व्हिडीओत दिसतं. या व्हिडीओ पोस्टवर सत्यमेव जयते अशी कॅप्शन देण्यात आली आहे.