पोलिसांच्या आश्वासनानंतर हिंदू संघटनांचे सोमवारी होणारे आंदोलन स्थगित

धुळे – महिन्याभरापूर्वी नगाव बारी परिसरातून अल्पवयीन मुलीस विविध प्रलोभन देऊन एका षडयंत्र प्रमाणे मुलीचे अपहरण केले त्या संदर्भात अपहरणाचा गुन्हा दाखल होऊन 21 दिवस उलटून गेले तरी देखील पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई केल्या गेलेली नाही. त्यासंदर्भात काल भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड रोहित चांदोडे यांच्या उपस्थितीत समस्त हिंदुत्ववादी संघटना डॉ. योगेश पाटील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह राजेश पाटील यांच्यासह मुलीचे पालक यांच्या समवेत पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांची भेट घेतली.

या भेटीमध्ये चर्चा होऊन सात दिवसात जर मुलगी परत आली नाही तर समस्त हिंदुत्ववादी संघटना हिंदू समाज म्हणून धुळे शहर बंद करून या घटनेचा निषेध करण्यात येईल व उग्र स्वरूपाचे आंदोलन करून या विषयाला वाचा फोडण्यात येईल असा इशारा देण्यात आला . दरम्यान, पोलीस प्रशासनाने सुद्धा सामंजस्याची भूमिका दाखवत सात दिवसाच्या आत आपल्याला मुलगी परत आणून देतो असे आश्वासन पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिले.

त्यामुळे सोमवारी होणारे आंदोलन हिंदू समाजाच्या वतीने स्थगित करण्यात आले. मुलगी ही तीन महिन्यानंतर वयात येणार आहे वयात आल्यानंतर तिचे धर्म परिवर्तन होऊन जाईल व मुलगी आम्हाला परत येणार नाही. असा इशारा व गंभीर बाब बारकुंड साहेबांना राजेशजी व सर्व शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.