पंजबाच्या विजयानंतर कॆजरीवाल म्हणाले, ‘बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे स्वप्न पूर्ण होते आहे’

पंजाब : आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पंजाबमध्ये यावेळी जनतेने ‘आप’ला पसंती दिली आहे. तर काँग्रेसची सपशेल पिछेहाट झाली आहे. निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये आपचे तब्बल ९१ उमेदवार आघाडीवर आहेत. तर यावेळी काँग्रेसला मोठा फटका बसला असून, राज्यात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने केवळ १९ जागांवर आघाडी घेतली आहे.

या भव्य विजयानंतर आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी देशातील जनतेला संबोधित केले आहे. ‘आज जे पंजाबचे निकाल आले आहे ही एक इन्कलाब आहे. आज मोठं मोठ्या खुर्च्या हल्ल्या आहेत. सुखबीर सिंग बादल हरले. कॅप्टन चरणजित सिंग हरले, प्रकाशसिंग बादल हरले. नवज्योत सिंग सिद्धू हरले. विक्रम सिंग हरले. पंजाबच्या लोकांनी कमाल केला आहे. ही सर्वात मोठी क्रांती आहे.’ असं केजरीवाल म्हणाले आहेत.

केजरीवालांनी सांगितलं, ‘भगतसिंग म्हणाले होते, आझादी मिळाल्यावर सिस्टम नाही बदललं तर काहीच नाही होणार. ही दुःखाची बाब आहे कि, 75 वर्षांपासून या पार्ट्यांनी इंग्रजाचे सिस्टम ठेवले होते. देशाला लुटत होते. लोकांना जाणूनबुजून गरीब ठेवले. आम आदमी पार्टीने गेल्या 7 वर्षांपसून हे सिस्टीम बदलले आहे. आम्ही इमानदार राजनितीची सुरुवात केली आहे. मुलाना शिक्षा मिळत आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे स्वप्न पूर्ण होते आहे.’