पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आणि कार्य जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श – अजित पवार

मुंबई – पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Rajmata Ahilya Devi Holkar) सर्वकालीन महान राज्यकर्त्या, कुशल प्रशासक होत्या. थोर विचारवंत होत्या. त्यांचे विचार सुधारणावादी, अंधश्रद्धेवर प्रहार (An attack on superstition) करणारे होते. त्यांचे कार्य, विचार जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी पुण्यश्लोक, राजमाता, अहिल्यादेवी माँसाहेबांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले आहे.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे स्मरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जात, पात, धर्म, पंथ, प्रांतांच्या, सीमा ओलांडून संपूर्ण देशात लोकोपयोगी कार्याचा डोंगर उभा केला. देशभर मंदिरं, नदीघाट, धर्मशाळा, पाणपोयी बांधल्या. अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा यांच्याविरुद्ध लढा दिला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महान योद्धा (The great warrior) होत्या. कुशल प्रशासक, न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष, दानशूर राज्यकर्त्या होत्या. मुलकी आणि लष्करी प्रशासन वेगळे करुन कुशल राज्यकारभाराची चुणुक त्यांनी दाखवली. महिलांच्या सक्षमीकरणाचं काम त्यांनी केलं. महिलांना शिक्षण (Education for women) , प्रशिक्षण, अधिकार दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी सर्वकालीन आदर्श राष्ट्रनिर्मात्या (The ideal nation builder of all time) आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला.