Mughal Garden : मुघल गार्डनचे नाव बदलल्याने विरोधकांना झोंबल्या मिरच्या, AIMIM आणि कॉंग्रेसची भाजपवर टीका 

Amrit Udyan: राजधानी दिल्लीत असलेल्या राष्ट्रपती भवनाच्या मुघल उद्यानाला आता अमृत उद्यान म्हटले जाणार आहे. केंद्र सरकारने त्याचे नाव बदलले आहे. मुघल गार्डनचे नाव बदलण्यावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काही लोक सरकारवर निशाणा साधत आहेत तर काही लोक या निर्णयाचे स्वागत करत आहेत.

भाजप सरकारवर निशाणा साधत एआयएमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण म्हणाले की, मुघल गार्डन आणि टिपू सुलतान गार्डनचे नामांतर केल्याने देशाचा विकास होईल आणि बेरोजगारी संपेल का? पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? सरकारवर आरोप करत वारिस पठाण पुढे म्हणाले की, खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष वळवण्यासाठी भाजप केवळ नामकरणाचे राजकारण करत आहे.

AIMIM प्रमाणेच मुघल गार्डनचे नाव बदलण्यावर काँग्रेसचे नेते रशीद अल्वी म्हणाले, ही भाजप सरकारची सवय आहे, ते शहरांची आणि रस्त्यांची नावे बदलतात. आता उद्यानही बदलले आहे. मी याचा निषेध करतो. दुसऱ्याने केलेल्या एखाद्या गोष्टीचे नाव बदलण्याचा अधिकार त्यांना नाही.  ब्रिटिशांनी दिलेले नाव बदलणे हा इतिहास आहे. नाही. सरकार आता निर्बुद्ध लोकांच्या हाती आले आहे.