Aishwary Thackeray | बाळासाहेब ठाकरेंचा नातू रुपेरी पडदा गाजवायला सज्ज, लवकरच बॉलीवूडमध्ये करणार पदार्पण

Aishwary Thackeray | बाळासाहेब ठाकरे यांना कोण ओळखत नाही. ठाकरे कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे नाव आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःचा राजकीय पक्ष शिवसेना स्थापन केला. त्यांच्यानंतर उध्दव ठाकरे, राज ठाकरे यांनीही राजकारणावर आपली पकड घट्ट केली. उध्दव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे ही राजकारणात सक्रिय आहे. अशात एक ठाकरे पुत्र मात्र राजकारण नव्हे तर रुपेरी पडदा गाजवायला सज्ज झाला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि चित्रपट निर्माती स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य ठाकरे (Aishwary Thackeray) आता रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.

पाच वर्ष चित्रपटाच्या सेटवर…

ऐश्वर्यला राजकारणात रस नाही. ठाकरे कुटुंबात असूनही ऐश्वर्य सिनेसृष्टीत पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. ऐश्वर्यने जवळपास पाच वर्ष चित्रपटाच्या सेटवर घालवली आहेत. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.

‘एबीपी माझा’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्य ठाकरे आता लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. येत्या काही महिन्यात याबाबतची एक मोठी घोषणा होऊ शकते. काही मोठे निर्माते ऐश्वर्यसोबतच्या चित्रपटाची घोषणा करण्याची शक्यता आहे. ऐश्वर्य ठाकरेचे दणक्यात लाँचिंग करण्याचे नियोजन असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप