शरद पवार यांनी जातीपातीत भांडण लावणारी विधान करणे आता बंद करावे – चव्हाण

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरे यांच्याइतका अन्याय दुसऱ्या कोणीही केला नाही, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मांडलं आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले असून या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

शरद पवार म्हणाले, काही लोकांनी शिवचरित्राबाबत अर्धवट आणि धादांत खोटी माहिती पसरवली. त्यातील काही पुस्तके महाराष्ट्रात खूप खपली. घराघरांत ठेवली गेली. त्यात बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचंही पुस्तक होतं. मात्र, माझ्या मते पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांवर मोठा अन्याय केला आहे. दरम्यान, या वक्तव्यावरून शरद पवारांवर पुन्हा एकदा जातीयवादाचा आरोप होऊ लागला आहे काहींनी हे वक्तव्य त्यांनी ब्राह्मणद्वेषातून केल्याचं म्हटले आहे. तर काहींच्या मते आगामी निवडणुका समोर ठेवून पवार यांनी हे वक्तव्य केल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा भाजप नेते आणि प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांनी समाचार घेतला आहे. ते म्हणाले, खा.शरद पवार यांनी जातीपाती भांडण लावणारी विधान करणे आता बंद करावे. राज्यात मराठा समाजाचे आरक्षण गेले, धनगर समाजाला आरक्षण मिळू शकले नाही, ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले तेव्हा सत्तेत असलेले पवार काय करत होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

ते म्हणाले, पवार साहेबांचे ते वक्तव्य ऐकून मनाला मोठ्या वेदना झाल्या. पवार साहेब यांना माझी विनंती आहे की पुढील पिढ्यांना आपल्याबद्दल आदर वाटावा असं वाटत असेल तर कृपया शी विधानं करणे थांबवा. आपण सत्तेत नसल्यावारच आपणास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने लिहिला असं आपणास का जाणावत ? का आपण सत्तेत नसल्यावारच मराठा आणि बहुजन समाजातील तरुणांची माथी भडकतील अशी विधानं करता ? हे आता मराठा समाजातील तरुण आणि बहुजन समाजातील तरुणांच्या लक्षात आले आहे.आम्ही आता हे सगळे डाव ओळखतो.

आपली सत्ता असताना मराठा समाजाला,धनगर समाजाला आरक्षण का मिळाले नाही. ओबीसींचे राजकीय आरक्षण का गेले? पवार साहेब आपण जेष्ठ नेते आहात. आपला उदय ज्या राज्यातून झाला त्या राज्यातून अतिशय वाईट पद्धतीने असत व्हावा असं जर आपल्याला वाटत नसेल तर अशा पद्धतीची विधाने करणे कृपया थांबवा. मराठा समाजातील तरुण आणि बहुजन समाजातील तरुण आता या पवारकाव्याला बळी पडणार नाहीत असं देखील त्यांनी सुनावले आहे.