मोठी बातमी : मुंबई कसोटीतून अजिंक्य रहाणेसह आणखी दोघांना वगळले

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी आणि अंतिम कसोटी मुंबईत आजपासून सुरू होणार आहे. मुंबईत दोन दिवस झालेल्या पावसामुळे मैदान ओले आहे त्यामुळे नाणेफेक होण्यास उशीर होत आहे.

दरम्यान, सकाळी साडे दहा वाजता पुन्हा एकदा मैदानाची पाहणी करून मग नाणेफेक होणार आहे. दरम्यान बीसीसीआयने एक मोठी अपडेट दिली आहे.बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या इशांत शर्मा, रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे यांना दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले आहे.

या तिघांनाही दुखापतीच्या समस्या असल्याची माहिती मिळाली आहे. इशांत शर्माच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. पहिल्या कसोटीत जडेजाच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती आणि स्कॅनमध्ये सूज असल्याचे दिसून आले. त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. कानपूरमध्ये शेवटच्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना रहाणेला हाताला किरकोळ दुखापत झाली. तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही.