राज्यात अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा अजितदादांचा निर्णय

अजित पवार

मुंबई – अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे राज्यात शंभरहून अधिक नागरिकांचा झालेला मृत्यू, पशुधनाची झालेली हानी, शेतजमीन व पिकांचे नुकसान, घरांची व दुकानांची पडझड, या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी  (२२ जुलै ) त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी माझा वाढदिवस साजरा करु नये, वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून तो निधीतून राज्यातील पूरग्रस्त शेतकरी, विद्यार्थ्यांना मदत करावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचाआज ( २२ जुलै रोजी ) वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी कोणत्याही सोहळा-समारंभांचे आयोजन करु नये, पुष्पगुच्छ पाठवू नयेत, होर्डिंग्ज लावू नयेत, वृत्तपत्रे, टिव्ही, समाजमाध्यमांवर जाहिराती प्रसारित करु नयेत, यावर होणारा खर्च वाचवून त्या निधीतून पूरग्रस्त शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना मदत करावी. लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही अजित पवार यांनी कालच केले आहे.

Previous Post
अनुराग ठाकूर

देशविरोधी मजकूर प्रसारित करणाऱ्या युट्युब चॅनेल,सोशल मिडिया अकाउंटस आणि वेबसाईटला केंद्र सरकारचा दणका 

Next Post
Nana Patole

मोदी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात आरपारची लढाई : नाना पटोले

Related Posts
Corn Crop

मका पिकावर ‘या’ धोकादायक किडीचा हल्ला; संपूर्ण पिकाची नासाडी होण्याची शक्यता

पटना – बिहारमधील मुझफ्फरपूर (Muzaffarpur in Bihar) जिल्ह्यात मका पिकाला मोठा धोका निर्माण झाला आहे. कडाक्याच्या थंडीच्या लाटेत…
Read More
संधी मिळूनही अजित दादा तुम्हाला शरद पवारांनी मुख्यमंत्री केले नाही; फडणविसांनी ठेवले मर्मावर बोट 

संधी मिळूनही अजित दादा तुम्हाला शरद पवारांनी मुख्यमंत्री केले नाही; फडणविसांनी ठेवले मर्मावर बोट 

 Nagpur – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा सभागृहात विदर्भाच्या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान तुफान टोलेबाजी केली. विरोधी पक्षनेते…
Read More
Sambhajiraje Chhatrapati

मराठा समाजासाठी छत्रपती संभाजीराजेंच्या उपोषणाला भाजपाचा पाठिंबा

पुणे – मराठा आरक्षण व इतर प्रलंबित मागण्यांसाठी दि. २६ फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी जाहीर केले…
Read More