जुन्या- नव्या नेत्यांचा योग्य समन्वय घडवून पक्ष वाढीचे काम करू – अजित पवार

जुन्या- नव्या नेत्यांचा योग्य समन्वय घडवून पक्ष वाढीचे काम करू – अजित पवार

मुंबई : गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, माजी उपनगराध्यक्ष स्नेहा बागडे, प्रदीप बेंडल यांनी आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनिल तटकरे, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख उपस्थित होते.

आजच्या पक्ष प्रवेशामुळे नवे चेहरे आपल्याला मिळाले आहेत. जुन्या- नव्या नेत्यांचा योग्य समन्वय घडवून पक्ष वाढीचे काम आपल्याला करायचे आहे, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोकणचा विकास करण्याची आमची भूमिका आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कोकणात आर्थिक सुबत्ता यावी यासाठी आदरणीय शरद पवार साहेबांनी अनेक निर्णय घेतले. कोकण रेल्वे होण्यासाठी पवार साहेबांनी पुढाकार घेतला. पवार साहेबांचे कोकणावर अपार प्रेम आहे. कोकणाचा कुठलाही प्रश्न आला तर कोकणवासियांसाठी सहकार्याची भावना ठेवा अशी पवार साहेबांची आम्हाला सूचना असते, असेही अजित पवार म्हणाले.

यापुढे चिपळूण, दापोली, गुहागर या पट्ट्यातील अनेक नेते, कार्यकर्ते पक्षात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय देण्याची आमची भूमिका असते. कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट झाला पाहिजे, असा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. पुढील आठवड्यात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा कोकणात येणार आहे. त्यावेळी कोकणातील कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करु असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

आजच्या पक्ष प्रवेशामुळे गुहागर, चिपळूण भागात राष्ट्रवादीची ताकद नक्कीच वाढेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. कुणबी समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली होती. अनेक वर्ष कुणबी समाजाचे नेतृत्व करुनही अनेक नेत्यांनी समाजासाठी काहीच केले नव्हते. मात्र पवार साहेबांनी समाजाला आश्वस्त केले, शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलुंड येथे कुणबी समाजाच्या वसतिगृहासाठी पाच कोटींचा निधी दिल्याचेही खासदार सुनिल तटकरे यांनी आवर्जून सांगितले.

हे ही पहा:

https://youtu.be/lbCAx3D6bzQ

Previous Post
पुणे महापालिकेकडून मिळकत कराची दामदुपटीने वसुली, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे जाहीर निषेध

पुणे महापालिकेकडून मिळकत कराची दामदुपटीने वसुली, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे जाहीर निषेध

Next Post
मी बेईमान आहे की शब्दाचा पक्का, हे महाराष्ट्राला माहित आहे – अजित पवार

मी बेईमान आहे की शब्दाचा पक्का, हे महाराष्ट्राला माहित आहे – अजित पवार

Related Posts
शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेवर 'या' नेत्यांची लागू शकते वर्णी

शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेवर ‘या’ नेत्यांची लागू शकते वर्णी

मुंबई : छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांना शिवसेना पुरस्कृत नाहीतर शिवबंधन बांधून (build Shivbandhan) सेनेत प्रवेश केल्यानंतरच…
Read More

ज्यांचा भारतात जन्म झाला, ते हिंदूच; मलाही हिंदू म्हणा – आरिफ मोहम्मद खान 

तिरुअनंतपुरम –  ज्यांचा भारतात जन्म झाला आहे, ज्यांनी भारतातील अन्न खाल्लं आहे. त्या सर्वांना हिंदू (Hindu) म्हणण्याचा हक्क…
Read More
Partner | तुमचा पार्टनर तुमच्यासोबतच्या नात्यात आनंदी आहे की नाही हे कसे ओळखावे ?

Partner | तुमचा पार्टनर तुमच्यासोबतच्या नात्यात आनंदी आहे की नाही हे कसे ओळखावे ?

नातं निरोगी ठेवण्यासाठी दोन्ही जोडीदारांनी आनंदी राहणं खूप गरजेचं आहे. काही कारणाने तुमचा पार्टनर (Partner) खूश नसेल तर…
Read More