राज्याची आर्थिक घडी विस्कटली नाही…विकासकामे थांबली नसल्याचा अजितदादांचा दावा

राज्याची आर्थिक घडी विस्कटली नाही...विकासकामे थांबली नसल्याचा अजितदादांचा दावा

मुंबई – महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांच्या कारकिर्दीत राज्यासमोरच्या प्रत्येक आव्हानावर यशस्वी मात केली. जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षांवर खरं उतरण्याचा, जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निष्ठापूर्वक, प्रामाणिक प्रयत्न केला असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

कृषी, उद्योग, वीज, व्यापार, शिक्षण, सहकार, साहित्य, कला, नाट्य, संस्कृती, पर्यटन अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचे अव्वल स्थान कायम रहावे. नागरिकांमध्ये एकता, समता, बंधुतेची भावना वाढावी. सर्व समाजघटकांना विकासाची समान संधी उपलब्ध व्हावी. महाराष्ट्राची सर्व क्षेत्रात प्रगती व्हावी, यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील प्रत्येक जण प्रयत्नशील आहे. महाविकास आघाडी सरकार भक्कम असून महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या कल्याणासाठी सर्वांना सोबत घेऊन यापुढेही निष्ठेने काम करीत राहील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

दोन वर्षांच्या काळात महाविकास आघाडी सरकारला साथ, सहकार्य दिलेल्या, सरकारवर विश्वास व्यक्त केलेल्या सर्वांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी मन:पूर्वक आभार मानले. सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा देतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त सर्वांचे आभार मानले असून राज्यातील जनतेला शुभेच्छाही दिल्या आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील जनतेचे आभार मानताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सत्तास्थापनेला आज दोन वर्षे होत आहेत. दोन वर्षांपूर्वी एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आले. या दोन वर्षांच्या काळात राज्यावर कोरोना, अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळासारखी अनेक नैसर्गिक संकटे आली. कोरोनामुळे टाळेबंदी जाहीर झाली. त्याचा उद्योग, व्यापार, अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. संकटे किती मोठी असली तरी महाराष्ट्र कधी खचला नाही. कुणापुढे झुकला नाही. संकटे जितकी गंभीर.. तितका महाराष्ट्र खंबीर… हा इतिहास आहे. महाविकास आघाडी सरकारने ती परंपरा कायम राखली आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ बसू दिली नाही. प्रत्येक संकटाचा यशस्वी मुकाबला करण्याची परंपरा महाविकास आघाडी सरकारनेही कायम ठेवली. राज्यातील प्रत्येकाला सोबत, विश्वासात घेऊन सर्वांच्या मदतीने, सहकार्याने, एकजुटीने राज्यावरच्या संकटावर मात केली. प्रत्येक महाराष्ट्रवासियाला याचा अभिमान आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.

राज्यावरचे कोरोना संकट अभूतपूर्व असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, फार्मासिस्ट, सफाई कामगार, पोलिस, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज संस्थांचे, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, राज्यातल्या प्रत्येक नागरिकांने जीवाची जोखीम पत्करुन कोरोनाविरोधी लढ्यात अमूल्य योगदान दिले आहे. या कोरोना योद्ध्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृतज्ञतापूर्वक आभार मानले असून कोरोना योद्ध्यांचा त्याग महाराष्ट्र कायम लक्षात ठेवील, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

कोरोना संकटांच्या बरोबरीने राज्यासमोर आर्थिक आव्हानेही उभी राहिली. या आव्हानांचा सामना करताना राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही, राज्यातली विकासकामे थांबणार नाहीत. विकासाची प्रक्रिया अखंड, निरंतर सुरु राहील याची संपूर्ण काळजी घेण्यात आली. रस्ते, रेल्वे, मेट्रो, कोस्टलरोड, उड्डाणपूलांसारख्या पायाभूत प्रकल्पाची कामे गतीमान करण्यात आली. पायाभूत प्रकल्प निर्मितीबरोबरच नागरिकांचे रोजचे जगणे सुसह्य होईल यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. धोरणे आखून अंमलबजावणी करण्यात आल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी, सर्वांगीण विकासासाठी बांधिल असल्याचा शब्द पुन्हा एकदा दिला.

शेतकरी कर्जमुक्ती, शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज, आमदार स्थानिक निधीत वाढ, आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत, आरोग्य सेवेचे सक्षमीकरण, शिवभोजन थाळी, मागास, आदिवासी, अल्पसंख्याक बांधवांच्या विकासासाठी भरीव निधी अशा अनेक निर्णयांची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

Previous Post
'माझ्या कुटुंबाची हेरगिरी करण्यात येत आहे, केंद्रीय गृहमंत्री आणि मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करणार'

‘माझ्या कुटुंबाची हेरगिरी करण्यात येत आहे, केंद्रीय गृहमंत्री आणि मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करणार’

Next Post
काही दिवसातच भाजपला सोडचिठ्ठी देऊन आमदार घरवापसी करतील - नवाब मलिक

काही दिवसातच भाजपला सोडचिठ्ठी देऊन आमदार घरवापसी करतील – नवाब मलिक

Related Posts
Mansi Naik | टाळ्यांच्या गजरात धाराशिवकरांनी धरला 'मानसी'च्या तालावर ठेका!

Mansi Naik | टाळ्यांच्या गजरात धाराशिवकरांनी धरला ‘मानसी’च्या तालावर ठेका!

Mansi Naik Lavni: सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्तवतीने आयोजित या महोत्सवात शनिवारी सांयकाळी ७वा ‘संस्कृती महाराष्ट्राची’…
Read More
‘विद्युत रोषणाईने सजलेल्या मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक

‘विद्युत रोषणाईने सजलेल्या मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या (Bhausaheb Rangari Ganapati) बाप्पाची विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणे यंदाही…
Read More
मावळात महायुतीत संघर्ष; भाजपचे नेते महायुतीचा धर्म विसरले? Maval Assembly Constituency 

मावळात महायुतीत संघर्ष; भाजपचे नेते महायुतीचा धर्म विसरले? Maval Assembly Constituency 

Maval Assembly Constituency : पुणे  महायुतीत (Mahayuti) ‘मावळ’ विधानसभेच्या अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे वारंवार दिसून येत आहे. ही जागा…
Read More