…तोपर्यंत हे सरकार चालणार, ही काळ्या दगडावरची रेघ – अजित पवार

पुणे : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्याचे राजकारण ढवळून निघत आहे. भाजपकडून नवाब मलिक यांच्या राजिन्याम्यासाठी दबाव वाढत आहे. अशात आमदार रवी राणा यांनी राज्यात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याचा दावा केला आहे. तर, विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांनी नवाब मालिकांचा राजीनामा घेतला तर राष्ट्रवादी सरकारचा पाठिंबा काढून घेणार असल्याचा दावा केलाय. अशात आता सरकार अस्थिर होणार का ? याकडे राज्याचे लक्ष लागल;ए असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केले आहे.

आरोप प्रत्यारोपमध्ये महाराष्ट्र पुढे जाणार नाही. ज्यांना काय म्हणायचं आहे ते त्यांना म्हणू द्या.आम्हाला आमचं काम भलं अन् आम्ही भले. याबाबत पक्षाचे नेते शरद पवार यांनी भूमिका मांडली आहे. जे आज तारखा देत आहे. त्यांना तारख्या देऊ द्या. ज्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हापासून महाविकास आघाडी सरकार आले आहे, तेव्हापासून विरोधीपक्षाच्या नेत्यांकडून तारखा दिल्या जात आहे. तोपर्यंत 145 ची मॅजिक फिगर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी आहे. तसेच जो पर्यंत हे तिन्ही पक्ष एकत्र आहे. तोपर्यंत हे सरकार चालणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात तळजाई येथील वन उद्यानाचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

प्रत्येकाने हे बघितलं आहे की कोणीतरी एखादा व्यक्ती पहाटे 3 वाजता ट्विट करतो आणि त्यानंतर 5 वाजता अधिकरी येत असतात. मंत्री नवाब मलिक यांचे प्रकरण हे 1993 चे आहे. आज 2022 आहे. न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून ते आपली भूमिका मांडत आहे. सरकार येतात आणि जातात पण द्वेषभावनेतून ज्याने त्याने कस वागावं हे त्याने ठरवावं, असे देखील यावेळी पवार म्हणाले.