‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांमध्ये राज्याला विकासाच्या वाटेवर पुढे नेण्याची ताकद’

मुंबई : महात्मा जोतीबा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले. आज त्यांच्या स्मृतीदिनी राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे.

सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. स्त्रीयांसाठी शिक्षणाची दारे खुली करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद, धर्मव्यवस्थेच्या गुलामगिरीतून समाजाला बाहेर काढून वैचारिक, सामाजिक क्रांती घडवली. असं अजित पवार म्हणाले आहेत.

तर, राज्यकर्त्यांनी शेतकरी, बहुजन समाजाला केंद्रस्थानी ठेवून धोरणं आखली पाहिजेत हा विचार दिला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विचारांमध्ये राज्याला, देशाला विकासाच्या वाटेवर पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे. त्यांच्या विचारांनी, दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा आपण निर्धार करुया,” अशा शब्दात उपमुख्यमत्री अजित पवार यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचे स्मरण करुन त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले आहे.

आधुनिक भारतातील समाज सुधारक ज्यांनी पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरू केली ज्यांनी आपली पत्नी सावित्रीबाईला शिक्षण देऊन तिला समाजामध्ये शिकवण्यासाठी सुशिक्षित बनवले, आणि देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान प्रदान केला, समाजाचे दगड धोंडे आपल्या अंगावर घेत या राष्ट्राला शिक्षणाचे महत्त्व सांगितले, अशे थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती आहे. साताऱ्यातील कटगुण या गावी ११ एप्रिल १८२७ रोजी जोतिबा फुले यांचा जन्म झाला. आणि २८ नोव्हेंबर १८९०ला त्यांचे निधन झाले.

हे देखील पहा