अजित पवार हे चुकीच्या पक्षात आहेत, त्यांनी शिवसेनेत यावं; शिंदेंच्या जवळच्या नेत्याने दिली खुली ऑफर

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत जातील अशा चर्चा सुरू आहेत. तसेच अजित पवारांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Ajit Pawar Meets Amit Shah) यांची भेट घेतल्याचेही म्हटले जात आहे. यातच आता अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत. त्यामुळं त्यांनी एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) शिवसेनेत (Shiv Sena) यावं असे आमंत्रण शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि उपनेते माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी दिलं आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) अजित दादा फक्त काम करणारा माणूस आहे, बाकी सगळी लुटारुंची टोळी आहे. अजित पवार हे चुकीच्या पक्षात आहेत. अजित पवार पक्ष सोडायची वाट बघत असल्याचे शिवतारे म्हणाले. अजित पवार हे थोतांड माणूस नाहीत. कोणीतरी सांगितलं म्हणून गेले आणि परत आले यावर माझा अजिबात विश्वास बसत नाही असं देखील ते म्हणाले.