पुणे म्हाडाच्या 4222 घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई :- पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात, पुणे म्हाडाच्या 4 हजार 222 घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्विकृतीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात झालेल्या या कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे म्हाडाच्या माध्यमातून पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यातल्या 4 हजार 222 घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीस आजपासून सुरुवात झाली. जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात ही सोडत निघणार आहे. पुणे म्हाडाची ‘जानेवारी 2022-ऑनलाईन सोडत’ योजना राज्यातल्या अनेक गरजूंचं, पुण्यासारख्या शहरात स्वस्त घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे.

https://youtu.be/3AmlxDP4tcU

Previous Post

साखर कारखान्यांसाठीच्या दक्षता पुरस्कारात महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना सर्वाधिक पुरस्कार

Next Post

सर्व लोकप्रतिनिधींच्या शिफारशी व सहकार्याने शंभर टक्के निधी खर्च करावा – भुजबळ

Related Posts
rushikesh ghati

आमचा लोकशाहीवर विश्वास, कांदोळकरांवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी – घाडी

म्हापसा : गोवा विधानसभा निवडणुकीत बार्देश मधून सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या मतदार संघातून आता आणखी एक धक्कादायक आणि…
Read More
आराध्या बच्चनच्या शाळेची फीस ऐकून सरकेल पायाखालची जमीन! देशातील 'या' महागड्या शाळेत शिकते

आराध्या बच्चनच्या शाळेची फीस ऐकून सरकेल पायाखालची जमीन! देशातील ‘या’ महागड्या शाळेत शिकते

Aaradhya Bachchan School Fees: बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek…
Read More

श्रीलंकेला ७३ धावांवर लोळवत भारताने चुकता केला २२ वर्षांचा हिशोब, विश्वविक्रमही केला नावावर

तिरुवनंतपुरम- भारतीय संघाने (Team India) मायदेशातील श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका ३-०च्या फरकाने (ODI Series) जिंकत पुन्हा आपला दबदबा राखला.…
Read More