‘भारतमातेच्या वीर सुपुत्राचे झालेले अपघाती निधन ही मनाला चटका लावणारी, डोळ्यात अश्रू आणणारी घटना’

bipin rawat

मुंबई  – देशाचे संरक्षणदल प्रमुख ‘चीफ ऑफ डिफेन्स’ जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांचे कुटुंबिय व वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्याची बातमी धक्कादायक तितकीच वेदनादायक आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार म्हणाले,  जनरल बिपीन रावत यांनी त्यांच्या लष्करी सेवेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत गाजवलेलं शौर्य, पराक्रम, त्यांची देशभक्ती देशवासियांच्या कायम स्मरणात राहील. युवकांना सैन्यदलात दाखल होण्यासाठी प्रेरणा देईल. जनरल बिपीन रावत यांनी भारतीय लष्कराचे प्रमुख म्हणून देशाची संरक्षणसिद्धता, गौरव वाढवण्यात त्यांनी योगदान दिलं. लष्करप्रमुखपदानंतर तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांची, संरक्षणदलप्रमुख पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.

पहिले संरक्षणदलप्रमुख तिन्ही सैन्यदलांमध्ये सहकार्य, समन्वय वाढवण्याचे काम केले. प्रदीर्घ लष्करी सेवेत असंख्य लढाया, मोहिमा यशस्वी केल्या. युद्धात आघाडीवर राहून सैन्याचे नेतृत्व केले. सहकारी अधिकारी, जवानांचे मनोबल कायम उंच ठेवण्यासाठी प्रयत्नशील त्यांचे नेतृत्व होते. त्यांच्यासारख्या भारतमातेच्या वीर सुपुत्राचे झालेले अपघाती निधन ही देशवासियांच्या मनाला चटका लावणारी, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणणारी घटना आहे.

‘चीफ ऑफ डिफेन्स’ जनरल बिपीन रावत, दुर्घटनेत मृत्यू पावलेले त्यांचे कुटुंब आणि लष्करी अधिकारी बंधूंना मी वंदन करतो. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या सर्वांच्या राष्ट्रसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘चीफ ऑफ डिफेन्स’ जनरल बिपीन रावत यांच्यासह दुर्घटनेत मृत्यू पावलेले त्यांचे कुटुंब व अन्य लष्करी अधिकाऱ्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Previous Post
बिपीन

‘शूर योद्ध्यांना मृत्यू हरवू शकत नाही;  जनरल बिपीन रावत यांच्या स्मृती प्रेरणा देत राहतील’

Next Post
bipin rawat

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास असलेले लष्करप्रमुख आज आपल्यातून निघून गेले’

Related Posts
WhatsApp स्टोरेज फुल झालं ? एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायची ते जाणून घ्या

WhatsApp स्टोरेज फुल झालं ? एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायची ते जाणून घ्या

WhatsApp : व्हॉट्सअॅप एक इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे ज्याद्वारे वापरकर्ते ऑडिओ, व्हिडिओ कॉल आणि संदेशांद्वारे जगभरातील कोणाशीही संपर्कात…
Read More
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सामाजिक कार्यास सर्वतोपरी मदत करणार - चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सामाजिक कार्यास सर्वतोपरी मदत करणार – चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

Chandrakant Patil: अखिल भारतीय मराठा महासंघाचे समाजासाठी चे कार्य उत्तम प्रकारे सुरु असून संघाच्या सामाजिक कार्यास सर्वतोपरी मदत…
Read More
Eknath Shinde | निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी; मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

Eknath Shinde | निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी; मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

मुंबई  : कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बनावट स्वाक्षरी (forged signature) तसेच शिक्के…
Read More