Satyajeet Tambe : बाळासाहेब थोरांतांनी बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, अजित पवारांचा खुलासा

Ajit Pawar on Satyajeet Tambe :नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक चांगलीच रंगतदार बनली आहे. या ठिकाणी उमेदवारी अर्ज मिळूनही काँग्रेसच्या डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नाही. त्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. आपल्या मुलासाठीच सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नसल्याचं सांगितलं जात आहे. तसेच सत्यजित तांबे यांना भाजपने पाठिंबा देण्याची भाषा सुरू केल्याने काँग्रेसच नव्हे तर महाविकास आघाडीतही खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आता यावर  विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांना आधीपासूनच याबाबत महिती होती असे त्यांच्या प्रतिक्रियेवरुन स्पष्ट होत आहे. ‘सत्यजित तांबेंबाबत मी थोरातांना आधीच सांगितलं होतं असे अजित पवार म्हणाले. अर्ज भरण्याच्या आदल्या रात्रीच साधव केल्याचे अजित पवारांनी सांगितले. थोरातांनी अजित पवारांकडे दुर्लक्ष का केलं? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.