Ajit Pawar | शहरात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी होवू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करा, पवारांचे निर्देश

Ajit Pawar | शहरात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी होवू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करा, पवारांचे निर्देश

Ajit Pawar | शहरात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचू नये, रस्त्यावर वाहतूक कोंडी होवू नये म्हणून सर्व विभागांनी समन्वय ठेवून तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच नागरिकांना पावसात कोणत्याही प्रकारची अडचण होवू नये म्हणून दक्षता बाळगावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले.

विधानभवन येथे झालेल्या या बैठकीस सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पुणे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पिंपरी चिंचवडचे प्र.पोलीस आयुक्त सुनील रामानंद, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, पुणे शहरात नुकत्याच झालेल्या पुर्व मान्सून पावसामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी झाली. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महानगरपालिका, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए इत्यादी विभागांनी समन्वय साधून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या समस्या येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

आपत्तीच्या ठिकाणी महानगरपालिकेने वेगाने प्रतिसाद द्यावा. शहर व परिसरातील धोकादायक जाहिरात फलक त्वरीत काढावेत. वाहतूकीस अडथळा निर्माण करणारे रत्यावरील अतिक्रमण काढावेत. महानगरपालिकेने नाल्यांची साफसफाई त्वरीत करावी. जाहिरात फलकांचे सुरक्षा ॲडिट करावे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील धोकादायक जाहिरात फलक त्वरित काढावेत असे सांगून नियमबाह्य जाहिरात फलक लावणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

पावसामुळे व वाऱ्यामुळे रस्त्यावर झाड पडल्यास आधुनिक यंत्राचा वापर करून रस्ता वाहतुकीसाठी त्वरित मोकळा करावा. कात्रज ते रावेत चौक पुलावर पाणी येऊ नये म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने उपाययोजना करावी. वारजे जंक्शन जवळील सेवा रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक कार्यवाही करावी. हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कायमस्वरूपी नियोजन करावे. त्यासाठी आवश्यकता असल्यास अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल, असे पवार म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Chandrashekhar Bawankule | विरोधकांचे खोटे नरेटिव्ह जनतेत जाऊन उघडे पाडणार, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Chandrashekhar Bawankule | विरोधकांचे खोटे नरेटिव्ह जनतेत जाऊन उघडे पाडणार, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Next Post
America Cricket Team | अमेरिकेच्या संघाने इतिहास घडवला; पहिल्यांदाच केली 'अशी' कामगिरी

America Cricket Team | अमेरिकेच्या संघाने इतिहास घडवला; पहिल्यांदाच केली ‘अशी’ कामगिरी

Related Posts
मनोज जरांगे पाटील मनुवादी, मनुवादी लोकांना आरक्षण देऊ नये; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य

मनोज जरांगे पाटील मनुवादी, मनुवादी लोकांना आरक्षण देऊ नये; लक्ष्मण माने यांचे वक्तव्य

Laxman Mane: शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पुढाकाराने दुग्धव्यवसाय, कुकूटपालन, शेतीचे विविध प्रयोग सर्वप्रथम बारामतीत आणि त्यानंतर राज्यात…
Read More
..नाहीतर राजकारणात असलेल्यांना आयची आय आठवेल!, ईदच्या शुभेच्छा देताना असं का म्हणाले अमोल कोल्हे

..नाहीतर राजकारणात असलेल्यांना आयची आय आठवेल!, ईदच्या शुभेच्छा देताना असं का म्हणाले अमोल कोल्हे

Eid Mubarak: आज देशभरात ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद (Ramjan Eid 2023) साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांमध्ये…
Read More
Eknath Shinde - Devendra Fadanvis

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनला मंजुरी देण्याचा तातडीचा निर्णय म्हणजे गुजरातसमोर झुकण्याचा प्रकार ?

मुंबई – बेकायदेशीर सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांचा मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनला (Mumbai-Ahmedabad…
Read More