भुजबळ लढाऊवृत्ती असेलेलं संकटांना न डगमगणारं नेतृत्व – अजित पवार

मुंबई – माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अमृतमोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी भुजबळ यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, छगन भुजबळ यांचा मी चाहता असून नेता बहुजनांचा नेता बहुगुणांचा असा छगन भुजबळ यांचा परिचय आहे.

ते म्हणाले, १९८६ मध्ये भुजबळ साहेब दुबईचा व्यापारी इकबाल शेखच्या वेशात बेळगावमध्ये घुसले होते. त्याबद्दल त्यांना अटक देखील झाली नंतर त्यांना जेलदेखील झाली. मराठी माणसाचा आवाज सीमा भागामध्ये कमी होणार नाही, यासाठी ते काम करत राहिले. आज देखील काही पक्ष संघटना ओबीसी बांधवांच्या करता खोटे गळे काढत आहेत. परंतु ते मगरीच्या अश्रू आहेत. देशात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या वेळेस राज्यांमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये अतिशय ठोस भूमिका घेण्याचं काम हे भुजबळ साहेबांनी केलं. राज्यात आघाडीचे सरकार वाचविण्यासाठी छगन भुजबळ यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. नाशिकमध्ये त्यांनी केलेला विकास, केलेल्या सुधारणा या अतिशय उत्कृष्ट आहे. छगन भुजबळ हे लढाऊवृत्ती संकटांना न डगमगणार संकटावर मात करणारे नेतृत्व आहे.

ते म्हणाले की, एखाद्या गोष्टीत लक्ष घालून जीव ओतून काम करणे हा छगन भुजबळ यांचा स्वभाव आहे. ओबीसी बांधवांच्या आरक्षणाच्या हक्कासाठी स्वतःची राजकीय कारकीर्द आणि जीवन धोक्यात टाकण्याची जोखीम त्यांनी पत्करलेली होती. याची नोंद या निमित्ताने आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. १० जून १९९९ ला ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्याच्यानंतर खरंतर लगेच निवडणुका झाल्या. सहा महिने आधी निवडणुका घेतल्या. भुजबळ साहेबांनी आणि बाकीच्या सगळ्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. त्यानंतर आघाडीची सत्ता आली त्यात त्यांनी उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भूषविले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या तोडीस तोड काम करून दाखवलं. दिल्लीत त्यांनी महाराष्ट्र सदन उभारलं. हे देशातील अतिशय उत्कृष्ट सदन आहे. यासाठी एकही पैसा दिला नसतांना नाहक बदनामी करण्यात आली. देशात एखाद्याची प्रतिमा मलिन करण्याचे घाणेरडे राजकारण काही जण करतात. त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे असे त्यांनी सांगितले.