वक्तव्य करताना वेडेवाकडे परिणाम होणार नाही याची काळजी घ्या; अजितदादांनी नानांना सुनावलं 

मुंबई –  भंडारा(Bhandara) आणि गोंदिया(Gondia) जिल्हापरिषद निवडणुकीत झालेल्या अभद्र युतीमुळे महाविकास आघाडीत(Mahavikas aaghadi goverment) तणाव निर्माण झाला आहे.  राष्ट्रवादीने ( NCP) आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि भाजपासोबत गटबंधन (alliance with BJP)केले. त्यामुळे आम्ही आज त्यांना सत्तेपासून दूर ठेवले, असा गौप्यस्फोट कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी  भंडारा येथे केला आहे.

‘आम्ही मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल(Prafulla patel), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(State President Jayant Patil) यांच्याशी संपर्क केला होता. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले आणि पंचायत समितीच्या अध्यक्ष -उपाध्यक्ष निवडणुकी दरम्यान भाजपशी हात मिळवणी करीत आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. गोंदिया आणि भंडारामध्ये ज्या पद्धतीने भाजपा सोबत राष्ट्रवादी सत्ता स्थापन करीत आहे. त्यावरून राष्ट्रवादीची भूमिका नेमकी काय आहे, हे स्पष्ट होत आहे. असं देखील पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पटोले यांच्या या टीकेला आता उपमुख्यमंत्री अजित पवार(Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले,  नाना पटोले यांचे स्टेटमेंट चुकीचे आहे. ते कुठुन आले आहेत ते सर्वांना माहीत आहे. त्यामुळे भाजपने बोलावं का नाना पटोले यांनी पाठीत खंजीर खुपसला. हेडलाईन बनण्यासाठी ते बोलले असावेत. जबाबदार नेत्याने वक्तव्य करताना वेडेवाकडे परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी असेही अजित पवार यांनी सुनावले.

यावेळी आमचेही काही पदाधिकारी त्यांनी घेतले आहेत. १५ वर्षे कॉंग्रेस व राष्ट्रवादी या दोघांनी सरकार चालवले आहे. त्यावेळी कार्यकर्ते घेत होतो. इतर पक्षात जाऊन त्यांची ताकद वाढण्यापेक्षा एकमेकांच्या पक्षात राहतील हे पाहिले पाहिजे. आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही किंवा तलवार खुपसत नाही आणि असे कधीही बोलत नाही असेही अजित पवार म्हणाले.