अजिंक्य रहाणेचा असाही दिलदारपणा ! ‘हा’ मोठा निर्णय घेत जिंकलं चाहत्यांचं मन

मुंबई : रणजी करंडक स्पर्धेसाठी मुंबईने आपला संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेसाठी अजिंक्य रहाणेचा देखील समावेश करण्यात आला आहे. मात्र या स्पर्धेत मुंबई संघाचे नेतृत्व पृथ्वी शॉ कडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणे संघात असताना पृथ्वी शॉकडे नेतृत्व सोपवल्याने निवड समितीवर टीका करण्यात आली. मात्र अजिंक्य रहाणेने संघात माझ्यामुळे कोणतेही बदल करू नये. मी पृथ्वी शॉच्या नेतृत्वखाली खेळण्यास तयार असल्याचं सांगत राहाणेनी चाहत्याचं मन जिंकलं आहे.

रणजी करंडक स्पर्धेच्या पहिल्या फेरीची लढत ही १७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या फेरीत गतविजेता सौराष्ट्र संघ मुंबई संघाशी भिडणार आहे. चेतेश्वर पुजारा सौराष्ट्र संघाकडून खेळत असल्याने राहणे आणि पुजारा प्रथमच एकमेकांना समोर येणार आहे. त्यामुळे याही स्पर्धेत चांगली रंगत चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

रणजी करंडक स्पर्धेसाठी मुंबईने आपला २१ सदस्य असलेला संघ जाहीर केला. यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा देखील समावेश करण्यात आला आहे. परंतु १९ वर्षाखालील विश्वचषकात दमदार कामगिरी बजावलेल्या अंगक्रिश रघुवंशीला स्थान देण्यात आले नाही. तर संघाच्या नेतृत्वाबद्दल अजिंक्य रहाणे म्हणाला की, संघाच्या नेतृत्त्वात कोणताही बदल करू नका, मी पृथ्वीच्या नेतृत्वाखाली खेळण्यास तयार आहे.

अजिंक्य रहाणे यांच्या बद्दल मुंबई निवड समितीचे अध्यक्ष सलील अंकोला यांनी सांगितले की, आम्ही मुंबईचा संघ यापूर्वीच निवडला होता. तेंव्हा पृथ्वी कर्णधार होता. अजिंक्य रहाणेने मुंबईकडून खेळण्याचे निश्चित करताना पृथ्वीलाच कर्णधार म्हणून कायम ठेवण्याची सूचनाही केली. अजिंक्यला आता मुंबईकडून खेळताना काहीही सिद्ध करायचे नाही. त्याने मुंबईकडून खेळण्याची तयारी दाखवली हेच महत्त्वाचे आहे. तो मुंबईकडून खेळताना कायम सर्वस्व पणास लावतो. आताही चांगल्या खेळी करेल हा विश्वास आहे. आम्ही पूर्वीच निवडलेला संघ कायम ठेवताना त्यात रहाणेचा समावेश केला आहे.