१० मार्चला भाजप हद्दपार, ‘मी येतोय’ ; अखिलेश यादवांनी फोडली डरकाळी !

मुंबई : आज पाच राज्यांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यासह देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू झाला आहे. 10 फेब्रुवारीपासून मतदान होणार असून 10 मार्चला निकाल लागणार आहे. पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूरमध्येही राजकीय तापमान वाढले आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

या निवडणुकीत भाजप, काँगेससह देशभरातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या पाच राज्यांपैकी सर्व देशाचे लक्ष लागले आहे ते उत्तर प्रदेश निवडणुकीकडे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक ही देशाच्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल मनाली जाते. त्यामुळे या निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, यांच्यासह अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने देखील जोरदार तयारी सुरु केली आहे.

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होताच अखिलेश यादव यांनी हुंकार भरत भाजपला उत्तर प्रदेशमधून हद्दपार करणार असल्याची डरकाळी फोडली आहे. किसान, नौजवान, महिला, मागास, दलित, अल्पसंख्याक, व्यापारी यांच्यासाठी खूषखबर, दहा मार्च रोजी अखिलेश यादव येत आहेत, असा विश्वास समाजवादी पक्षाने व्यक्त केला.