अकोल्यातून ‘लोकसभा’ लढवायचीय, भाजपाला चोपायची संधी सोडायची नाही; मिटकरींची डरकाळी

अकोला – अकोल्याचे भाजपचे खासदार संजय धोत्रे (Akola BJP MP Sanjay Dhotre) प्रकृती अस्वस्थामुळे गेल्या दीड वर्षापासून सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच आता आ. अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. आ. अमोल मिटकरी यांनी सोमवारी दुपारी एक ट्विट केले.

माझ्या पक्षाने संधी दिल्यास भाजप विरुद्ध अकोला लोकसभा मतदारसंघ मी लढवणार ! सध्या अकोला जिल्हा भ्रष्टाचार ग्रस्त व भाजपच्या मस्तीखोर राजकारणाने त्रस्त झाला आहे. या विरुद्ध मी लढायला तयार आहे. लवकरच पवार साहेबांची भेट घेऊन पुढची दिशा ठरवणार.भाजपला चोपायची हि संधी मला सोडायची नाही. असं मिटकरी यांनी म्हटले आहे.