खिलाडी अक्षय कुमारचा अपघात! ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या शूटिंगदरम्यान झाली दुखापत

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारशी (Akshay Kumar) संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या शूटिंगदरम्यान त्याला दुखापत (Akshay Kumar Injured) झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना घडली तेव्हा तो टायगर श्रॉफसोबत अॅक्शन सीनचे शूटिंग करत होता. मात्र, अक्षयने शूटिंग थांबवले नाही आणि जखमी होऊनही काम करत राहिला. चित्रपटाचे शूटिंग स्कॉटलंडमध्ये सुरू आहे.

हिंदुस्तान टाईम्समधील वृत्तानुसार की, “अक्षय टायगरसोबत अॅक्शन सीनचे शूटिंग करत असताना स्टंट करताना दुखापत झाली. सध्या त्याच्या गुडघ्यावर ब्रेसेस आहेत. त्यामुळे अॅक्शनचा  भाग तूर्तास स्थगित ठेवण्यात आला आहे. स्कॉटलंडचे शेड्यूल पूर्ण होण्यास विलंब होऊ नये म्हणून अक्षय त्याच्या बाकीच्या क्लोज-अप्ससोबत शूट करत राहतो.”

‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये अक्षय कुमार आणि टायगक श्रॉफ व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा आणि पृथ्वीराज सुकुमारन देखील दिसणार आहेत, ज्यांनी स्कॉटलंडला जाण्यापूर्वी मुंबईत आपले पहिले शेड्यूल पूर्ण केले आहे. ‘टायगर जिंदा है’, ‘सुलतान’, ‘भारत’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ आणि ‘गुंडे’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यासाठी ओळखला जाणारा अली अब्बास जफर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.