एलाॅन मस्क ‘ट्विटर’चे नवे मालक ! मोजले तब्बल ‘इतके’ अब्ज डॉलर

न्यूयॉर्क – टेस्ला मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क  (Elon Musk, CEO of Tesla Motors) आणि सर्वात प्रभावशाली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पैकी एक ट्विटर (Twitter) यांच्याबद्दलच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होत्या. काही आठवड्यांपूर्वी मस्क यांनी ट्विटरमधील ९.२ टक्के भागभांडवल विकत घेतले होते. त्यांनतर ते ट्विटरमधील सर्वात मोठे भागधारक बनले होते. यानंतर एलॉन मस्क आता ट्विटरचे मालक असतील. मस्क यांनी ट्विटर (Twitter) कंपनी ४४ अब्ज डॉलरमध्ये  विकत घेतली आहे.

मस्क यांनी ट्विटरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर ट्विटर विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मस्क यांनी प्रति शेअर 54.20 डॉलर या दराने ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली होती. ट्विटरच्या संचालक मंडळाने सोमवारी संध्याकाळी उशिरा ही ऑफर स्वीकारली आहे. ट्विटरवरून माहिती देताना टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी अखेर ट्विटर विकत घेतल्याची पुष्टी केली आहे. कंपनीने सांगितले आहे की मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी 44 अब्ज डॉलरचा करार केला आहे.

दरम्यान, ते म्हणाले कि मुक्तपणे बोलणे, व्यक्त होणे लोकशाहीचा कणा आहे. ट्विटर असं डिजिटल माध्यम ( Digital medium ) आहे ज्यावर भविष्यात मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टीबद्दल चर्चा केली जात असते. मस्क म्हणाले की, ”मला ट्विटर मध्ये नवीन फिचर्स आणायचे आहेत. लोकांचा या माध्यमांवरील विश्वास वाढवण्यासाठी हे एक अल्गोरिदम ओपन सोर्स बनवून, ट्विटरला अधिक चांगले बनवायचे आहे. स्पॅम बोट्स, सर्व व्यक्तींचं ऑथेंटिकेशन अशी बरीच काम डोक्यात आहेत. ट्विटरमध्ये फार क्षमता आहे. मी कंपनीसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. तसेच या माध्यमावर असणाऱ्यांसाठी नवीन दारं उघडली जाणार आहेत,” असं मस्क यांनी ट्विटर खात्यावरून ट्विट केलं आहे.