‘कन्यादान’च्या नवीन आयडियावरुन आलिया भट्ट ट्रोल, हिंदू धर्माचा अपमान केल्याने नेटकरी संतापले !

aalia

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. आलिया भट्ट नुकंतच ‘मान्यवर’ या प्रसिद्ध कपड्यांच्या जाहिरातीत झळकली आहे. आलियाची ही जाहिरात प्रचंड व्हायरल झाली असून यामुळे ती प्रचंड चर्चेत आली आहे. या जाहिरातीत आलिया भट्ट ही कन्यादान प्रथेविषयी बोलताना दिसत आहे. मात्र या जाहिरातीमुळे हिंदू धर्माचा अपमान झाल्याचं सांगत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

आलिया भट्ट ही नुकतंच मान्यवर या कपड्यांच्या जाहिरातीत झळकली आहे. या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आलिया नववधूच्या पोशाखात लग्न मंडपात दिसत आहे. यात आलिया तिच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य तिच्यावर किती प्रेम करतात, हे सांगताना दिसत आहे.

मात्र या जाहिरातीदरम्यान तिने विवाह सोहळ्यातील कन्यादानाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुलीला परक्याचे धन का मानले जाते? असा प्रश्न तिने विचारला आहे. “मुलगी ही दान करण्याची गोष्ट नाही, त्यामुळे कन्यादान नाही कन्यामान,” असा संदेश या व्हिडीओतून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Next Post
zp school

‘जिल्हा परिषदे’च्या शाळांमध्येही मिळणार आता दिल्लीच्या धर्तीवर शिक्षण

Related Posts
कार

७३ टक्के भारतीयांचा प्रवासासाठी वैयक्तिक कार वापरण्याकडे कल

मुंबई : शहरातच एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाण्यासाठी भारतीय(indian) नागरिकांद्वारे कार्सचा वापर सर्रास केला जातो. सुमारे ७३ टक्के…
Read More
विद्या चव्हाण

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदी विद्या चव्हाण यांची वर्णी;  वैशाली नागवडे यांच्यावरही मोठी जबाबदारी 

मुंबई   – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची निवड (Former MLA Vidya Chavan elected as…
Read More
आफताबला 1-2 नाही तर 20 हून अधिक गर्लफ्रेंड होत्या, श्रद्धा हत्याकांडात नवा खुलासा

आफताबला 1-2 नाही तर 20 हून अधिक गर्लफ्रेंड होत्या, श्रद्धा हत्याकांडात नवा खुलासा

नवी दिल्ली –  लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरच्या हत्येचा आरोप असलेला आफताब अमीन पूनावालाच्या चौकशीत नवनवीन खुलासे होत आहेत. आफताबने…
Read More