मोदींचे कौतुक करणे विद्यार्थ्याला पडले महागात; अलीगढ मुस्लिम विद्यापीठाने पीएचडीची पदवी नाकारली ?

नवी दिल्ली- अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (AMU) पुन्हा एकदा सोशल मीडियावर वादात सापडले आहे. खरं तर, एएमयूच्या एका विद्यार्थ्याने आरोप केला आहे की, मीडियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केल्याबद्दल त्याला पीएचडीची पदवी नाकारली जात आहे.

देशातील प्रतिष्ठित अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून पीएचडी केलेले दानिश रहीम म्हणतात की, मीडियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा करणे त्यांना महागात पडले आहे. पीएम मोदींची स्तुती केल्याबद्दल एएमयू प्रशासनाने त्यांना पदवी परत करण्याची नोटीस पाठवली असल्याचा आरोप रहीम यांनी केला आहे.

पंतप्रधानांच्या हस्तक्षेपाची मागणी

पंतप्रधानांच्या तात्काळ हस्तक्षेपाची मागणी करताना, AMU चा विद्यार्थी दानिश रहीम म्हणाले  की ‘AMU ने मला भाषाशास्त्रात मिळालेली पदवी परत करण्यास सांगितले आणि त्याऐवजी जाहिरात आणि विपणन (LAM) मध्ये पदवी घेण्यास सांगितले.

मी मोदींची स्तुती केल्यामुळे माझ्यासोबत हे घडत आहे. विद्यापीठाच्या संस्कृतीच्या विरोधात असलेली अशी कामे करण्यापासून दूर राहण्यास सांगितले होते, असे रहीम यांनी सांगितले. मला माझी पीएचडी पदवी परत एएमयूमध्ये जमा करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. ही प्रतिष्ठित पदवी मिळवण्यासाठी मी 5 वर्षे मेहनत केली आहे, मी माझी पदवी कशी परत करू शकतो? जर एएमयूने माझी पीएचडी पदवी रद्द केली, तर माझी संपूर्ण पदवी करिअर धोक्यात येईल असे रहीम यांनी सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=3AmlxDP4tcU

You May Also Like