हिमाचल प्रदेशमधील सर्व ६८ जागांचे प्राथमिक अंदाज समोर, काँग्रेस-भाजपात अटीतटीची लढत

नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून अतिशय मनोरंजक लढत या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेशात एकूण 68 जागा आहेत. यातून कधी भाजप पुढे होते, तर कधी काँग्रेस. सकाळी ९ वाजेपर्यंत भाजप ३२ जागांवर तर काँग्रेस ३३ जागांवर आघाडीवर आहे. हे सुरुवातीचे ट्रेंड असले तरी फासे कोणत्याही पक्षाकडे वळू शकतात हे निश्चित. हिमाचल प्रदेशात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 35 जागांची आवश्यकता असते.

हिमाचलमध्ये 12 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झाले. ज्या दिवशी एक्झिट पोल आले, काही एक्झिट पोल काँग्रेसचे सरकार स्थापन दाखवत होते, तर काही भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत दाखवत होते. मात्र, सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.(All 68 constituencies in Himachal Pradesh have primary trends, Congress-BJP close-fought)

हिमाचल प्रदेशात प्रत्येक वेळी सत्ताबदलाचा ट्रेंड आला आहे, मात्र विद्यमान मुख्यमंत्री जयराम ठाकूर पुन्हा एकदा भाजपला सत्तेत आणू शकतात का, हे पाहायचे आहे. जयराम ठाकूर हे हिमाचल प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख राजकारण्यांपैकी एक आहेत, ते 2017 मध्ये मंडी जिल्ह्यातील सिराज नावाच्या विधानसभेच्या जागेवरून आमदार म्हणून निवडून आले आणि मुख्यमंत्री म्हणून निवडून आले.

दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये सर्व ६८ जागांचे प्राथमिक अंदाज समोर आले आहेत. येथील एकूण ६८ जागांपैकी भाजपा ३३ जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस ३२ जागांवर पुढे आहे. येथे अपक्ष उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. सध्या ३ अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.