अंधेरीतील गोखले उड्डाणपूल लवकर पूर्ण होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न : मंगलप्रभात लोढा

मुंबई : अंधेरीतील गोखले उड्डाणपूल लवकर पूर्ण होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मंत्रलयात अंधेरीतील गोखले उड्डाणपूल संदर्भात त्यासंदर्भात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी या बैठकीत मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते.यावेळी या बैठकीला आमदार अमित साटम, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलारासू यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लोढा म्हणाले, गोखले उड्डाणपुलाचे पाडकाम ३ ते ४ महिन्यांत रेल्वेकडून करण्यात येईल.मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पुलाच्या प्री कास्टिंगचे काम याचदरम्यान सुरू राहिलं.मे २०२३ अखेरपर्यंत गोखले पुलाची किमान १ लाईन सुरू करण्याचा आमचा मानस आहे.या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी देखील चर्चा केलेली आहे. या पुलासंदर्भात रेल्वेकडून संपूर्ण सहकार्य मिळणार आहे. नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा व गोखले पुल देखील पूर्ण व्हावा, याकरिता प्रयत्न केले जात आहेत असेही पालकमंत्री लोढा यावेळी म्हणाले.