विकासासाठी मिळणाऱ्या निधीतून गावाचा सर्वांगिण विकास व्हावा – अजित पवार

बारामती :- कोऱ्हाळे खुर्द गावाच्या (Korhale Khurd village) विकासासाठी ९ कोटी ६४ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. विकासासाठी मिळणाऱ्या निधीतून गावाचा सर्वांगिण विकास करण्याचे आवाहन त्यांनी केले.

बारामती तालुक्यातील मौजे कोऱ्हाळे खुर्द येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप (Shri Someshwar Sahakari Sugar Factory) , माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे (Malegaon Co-operative Sugar Factories) , पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर (Pune District Central Co-operative Bank) , उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, सरपंच गोरख खोमणे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, बारामतीच्या(Baramati) गाडीखेल गावाच्या परिसरात वन विभागाच्या जागेत वाघ आणि सिंह सफारी करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होतील. अष्टविनायकसाठी शासनाने ५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे मंदिर परिसराचा कायापालट होण्यास मदत होवून भाविकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होतील.

बारामती येथील राजीव गांधी सायन्स अँड इनोव्हेशन सेंटर (Rajiv Gandhi Science and Innovation Center) मध्ये अत्याधुनिक उपकरणे आणि प्रयोगशाळा उपलब्ध आहे. खेड्यातील मुलांनी शाळेच्या माध्यमातून या केंद्राला भेट द्यावी, जेणेकरून त्यांच्या ज्ञानात भर पडेल. नवीन तंत्रज्ञान (New technology) आत्मसात करणे ही आता काळाची गरज आहे.

बारामती नीरा रस्ता चार पदरी करण्यात येणार आहे, रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. यंदा ऊसाचे पीक चांगले आहे. गावाच्या विकासासाठी सर्वांचाच सहभाग आवश्यक असतो. ग्रामपंचायतीने लोकाभिमुख पारदर्शक कारभार करावा, गोरगरीब लोकांना घरकुलाच्या माध्यमातून निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावीत. शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात. गावात सलोख्याचे वातावरण ठेवावे. विकास कामासाठी निधीची कमतरता कमी पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.