हार्दिक पांड्यासाठी धोक्याची घंटा ; ‘या’ अष्टपैलू खेळाडूंनी रोहित शर्माचं जिंकले मन

नवी दिल्ली : विराट कोहली आणि रिषभ पंत ने ठोकलेल्या अर्धशतकानंतर भुवनेश्वर कुमारने टाकलेल्या अफलातून १९ षटकाराच्या बळावर भारताने वेस्ट इंडीज विरूद्ध टी-२० मालिका देखील ८ धावांनी जिंकली. ३ सामन्यांच्या मालिकेत आता भारताकडे २-१ अशी आघाडी आहे. कोहलीने ४१ चेंडूत ५२ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली तर पंतने देखील ७ चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने फक्त २८ चेंडूत ५२ धावांची धमाकेदार खेळी केली. त्यामुळे प्रथम भारताने फलंदाजी करत वेस्ट इंडीज समोर १८६ धावांचा आव्हानात्मक डोंगर उभा करता आला.

भारताची सलामीवीर जोडी लवकरच ढेपाळल्याने विराट कोहली एकहाती किल्ला लढवला. विराट कोहली बाद झाल्यानंतर सुर्यकुमार यादवही स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या व्यंकटेश अय्यरने धुवाधार फलंदाजीचा नमुना पेश करत १८ चेंडूत वेगवान ३८ धावांची खेळी साकारली. वेस्ट इंडीज देखील सलामीवीर जोडी देखील जास्त वेळ मैदानावर तग धरून राहीली नाही. परंतु निकोलस पुरन आणि रावमन पॉवेलने भारतीय गोलंदाजांचा घाम काढत १०० धावांची भागीदारी रचली. परंतु भुवनेश्वर कुमारच्या अखेरच्या षटकात पुरन बाद झाल्यानंतर ६ चेंडूत २६ धावांची गरज होती.

पॉवेलने सामना जिंकण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु हर्षल पटेलने त्यांची ही मनिषा पुर्ण करू दिली नाही. पहिल्या चेंडूत पॉवेल फक्त एक धाव घेतली. त्यानंतर स्ट्राईकला आलेल्या पोलार्डने देखील एक धाव घेतली. मग आता ४ चेंडूत २४ धावांची आवश्यकता होती. शेवटच्या षटकातील ३ आणि ४ चेंडूत पॉवेलने उत्तुंग षटकार ठोकल्यानंतर २ चेंडूत ११ धावांची गरज असताना हर्षल पटेल ने पाचवा चेंडू अफलातून फेकला आणि फक्त एकच धाव दिली. शेवटच्या चेंडूत देखील एक धाव दिल्याने भारताने हा सामना ८ धावांनी जिंकला.

वेस्ट इंडीजविरूद्धच्या टी-२० सामन्यात व्यंकटेश अय्यरने जबरदस्त कामगिरी बजावली आहे. त्यामुळे बराच काळ संघाबाहेर असलेल्या हार्दिक पांड्यासमोर आता धोक्याची घंटा दिसून येत आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडूच्या शोधात होती. त्यामुळे पुढील काही सामन्यात व्यंकटेश अय्यरने चांगली कामगिरी केल्यास हार्दिक पांड्याला संघाबाहेर राहण्याची शक्यता आहे.