सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता १५ दिवसांत सुरू होणार; माधुरी मिसाळ यांनी दिली माहिती

पुणे – सिंहगड रस्त्याला (sinhgad road) पर्यायी  रस्ता १५  दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal)  यांनी कळविली आहे. मिसाळ यांनी अधिकाऱ्यांसोबत या रस्त्याची पाहाणी केली. मिसाळ म्हणाल्या, जनता वसाहत पु. ल. देशपांडे उद्यानामागील (P. L. Deshpande Udyan) रस्ता काँक्रिट करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर वृक्ष छाटणी आणि इलेक्ट्रिक विभागाची कामे १५ दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. विश्रांती नगर रस्ता , विठ्ठल मंदिर मागील रस्ता, हिंगणे चौक, कॅनॉल रस्ता आदी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सिहगड रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या (Bridge on Sihgad Road)  जागेची पाहाणी केली.

यावेळी श्रीनिवास बोनाला, प्रकल्प प्रमुख,  व्ही जी कुलकर्णी,  पथ विभाग प्रमुख, अमित घुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक, उदयसिंग शिंगाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिहगड रोड वाहतूक विभाग, प्रदीप आव्हाड, क्षेत्रीय अधिकारी सिहगड क्षेत्रीय कार्यालय, अमर शिंदे, कार्यकारी अभियंता पथ , राखी चौधरी, अभियंता पथ, अतुल कडू अभियंता पथ, अजय वायसे, कार्यकारी अभियंता प्रकल्प , सुश्मिता शिर्के, अधिक्षक अभियंता प्रकल्प, महादू थोपटे उपअभियंता , निखिल रंधवे, कनिष्ठ अभियंता, विश्वास ननावरे , प्रवीण दिवेकर , विशाल पवार उपस्थित होते.