’55 आमदारांना त्यांनी व्हीप जारी केला असला तरी तो आम्हाला अजून प्राप्त झालेला नाही’

मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे समर्थक व विधिमंडळातील शिवसेना पक्षाचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी शिवसेना आमदारांसाठी व्हीप बजावला केला आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या आमदारांना देखील व्हिप बजावलेला आहे. यामुळे आता पुन्हा अधिवेशनात ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू ( Sunil Prabhu ) यांनी प्रतिक्रिया देत इशारा दिला आहे. आम्हाला अद्याप पर्यंत व्हीप मिळालेला नाही. त्यांनी न्यायालयात सांगितले आहे की आम्ही व्हीप बजावणार नाही. न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन होईल असेही सुनील प्रभू यांनी म्हंटले असून न्यायालयात जाण्याची आमची तयारी असल्याचेही प्रभू यांनी म्हंटले आहे. 55 आमदारांना त्यांनी व्हीप जारी केला असला तरी तो आम्हाला अजून प्राप्त झालेला नाही.