पतियालामधून अमरिंदर सिंग यांची पिछेहाट; जाणून घ्या पंजाबमधील स्थिती 

 नवी दिल्ली :  उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडसह 5 राज्यांमध्ये सर्व विधानसभा जागांसाठी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली आहे. पंजाबमध्ये सुरुवातीच्या कलानुसार पतियालामधून माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची पिछेहाट सुरु आहे.

दरम्यान, पूर्व अमृतसरमधून नवज्योत सिंग सिद्धू, चामकौर साहिबमधून चरणजीत सिंग आघाडीवर, पठाणकोटमध्ये भाजपचे अश्विनी कुमार आघाडीवर असल्याचे चित्र आहे. याशिवाय सेंट्रल अमृतसरमध्ये काँग्रेसचे ओम प्रकाश सोनी, पूर्व अमृतसरमधून नवज्योत सिंग सिद्धू, नॉर्थ अमृतसर मधून शिरोमणी अकाली दलाचे अनिल जोशी, वेस्ट अमृतसरमधून काँग्रेसचे राजकुमार वेरका, आनंदपूर साहिबमधून आपचे हरजोत सिंग बैन्स आघाडीवर आहेत.

बाबा बाकलामधून काँग्रेसचे संतोख सिंग, चामकौर साहिबमधून चरणजीत सिंग आघाडीवर आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पठाणकोटमध्ये सभा घेतली होती. त्या  पठाणकोटमध्ये भाजपचे अश्विनी कुमार आघाडीवर आहेत.