अंबानी कमाई करण्यात अव्वल तर टाटा नोकऱ्या देण्यात आघाडीवर

मागील दोन वर्ष संपूर्ण जगासाठी प्रचंड अवघड होती. सुरवातीचे एक वर्ष तर प्रचंड अवघड होते कारण या काळात अनेक व्यवसाय डबगाईला आले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या सावटाखाली होते. आता पुन्हा सर्व काही ठीक होत आहे. तसे पाहिले तर आणखी देखील इतकी काही सुधारणा झालेली नाही पण पूर्वी पेक्षा आता सर्व सुधारत आहे. नवीन नोकरीच्या संधी येत आहेत. त्यामुळे आता नोकर भरती वाढत आहे.

भारतातील अनेक उद्योग कोरोना काळात देखील अविरत चालू होते. यांनी देखील देशांच्या आर्थिक घडीला व्यवस्थित ठेवले. टाटा आणि अंबानी यांनी देशाला फार मोठी आर्थिक मदत केली. कोरोना काळ असून देखील यांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे या कंपन्याचे शेअर्स चांगलेच भाव खाऊन गेले. यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक देखील खुश झाले.या सर्वांमध्ये महत्वाची एक गोष्ट म्हणजे कडक लॉकडाऊन असून देखील अंबानी ग्रुपने अनेक मोठे कामे मिळवली होती. यातून अंबानी यांना मोठा आर्थिक फायदा झाला.

अंबानी यांनी भरपूर पैसा कमविला पण टाटा ग्रुपने मात्र एक महत्वाचे काम केले आहे. टाटा ग्रुपच्या मार्केट कॅपमध्ये मोठी झेप घेतली आहे. टाटा ग्रुपने सर्वाधिक नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. असे एका रीपोर्टमधून दिसून आले आहे. त्यामुळे अंबानी यांनी पैसा कमाविला तर टाटांनी अनेकांना नोकऱ्या दिल्या.

सर्वाधिक नोकऱ्या या टाटा कन्सल्टन्सी सर्विस या कंपनीने दिल्या आहेत. टीसीएस नोकऱ्या देण्यामध्ये अव्वल ठरली आहे. टीसीएसने साडेपाच लाखांहून अधिक लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर क्वेस कॉर्प कंपनी असून त्यांनी साडे तीन लाख नोकऱ्या दिल्या आहेत. लार्सन अँड टुब्रो तिसऱ्या स्थानावर आहे. यांनी देखील तीन लाखांहून अधिक नोकऱ्या दिल्या आहेत. इन्फोसिसने अडीच लाख नोकऱ्या दिल्या आहेत तर रिलायन्सने देखील अडीच लाख नोकऱ्या दिल्या आहेत.बँकिंग क्षेत्रात एचडीफसीने सर्वाधिक नोकऱ्या दिल्या आहेत.