Vinayak Mete Death : विनायक मेटेंच्या निधनानंतर अमित शहांचा शोकसंदेश, म्हणाले…

Mumbai – शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Death) यांचं नुकतेच पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर अपघाती निधन झालं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असून ईश्वर त्यांच्या कुटुंबाला या धक्क्यातून सावरण्याची प्रेरणा देवो, असा शोकसंदेश देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी पाठवला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या नावाने शोकसंदेशाचे पत्र पाठवले. त्यात त्यांनी लिहिलेय, विनायक मेटे यांच्या निधनाची दुःखद बातमी ऐकून मी व्यथित झालो. महाराष्ट्राच्या राजकारणाचे कधीही भरून न निघाणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाबद्दल मी खेद व्यक्त करतो. दिवंगत आत्म्याला नम्रपणे श्रद्धांजली अर्पण करत ईश्वराकडे प्रार्थना करतो.. शोकाकूल कुटुंबाला आणि समर्थकांना या संकटात धीराने सामोरे जाण्याची शक्ती प्रदान करो… अशा आशयाचा हिंदी भाषेतील शोक संदेश अमित शहा यांनी पाठवला आहे.